EEA 2019 – अनुभव टेकनीकल चा

https://blog.deasra.in/inside-eea-2019/

EEA 2K19

आयुष्यात खूप सारे अविस्मरणीय क्षण असतात. जे पूरक असतात. आनंदी जगण्यासाठी, गोड आठवणी मनात साठवून ठेवण्यासाठी. असाच कालचा क्षण तो म्हणजे EEA 2K19.

तसा मी देआसरा मध्ये नवीनच माणूस. 2 महिन्यांपूर्वी माझी निवड याठिकाणी झाली होती. हळू हळू दिवस पुढे निघून जात होते. त्यातच म्हणजे नेहमी न जाणून एक वाक्य कानावर पडायच ते म्हणजे “अरे लवकरच आपला EEA चा इव्हेंट आहे.” काही दिवसानंतर कळालं कि EEA म्हणजे आपला देआसरा चा मोठा इव्हेंट असतो. बाहेरची खूप लोकं येतात. तस ऐकल्यावर माझ्या मनात आनंदाचे तुषार फुलत होते. पण मनात एक वाटत होत कि आपण या कार्यक्रमाचा हिस्सा बनू कि नाही. कारण मी नवीन होतो, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देतील असं मला वाटत नव्हतं. त्यामुळे मी त्याकडे थोडं दुर्लक्ष ठेवून होतो.

पण झालं असं कि एका मिटिंग मध्ये मला कळालं कि, “सागर तुला Technical पूर्ण सांभाळायचं आहे. ” तस थोडं मनात एक भीती निर्माण झाली. पण मी लगेच होकार दिला. कारण आईबाबांनी घरातून बाहेर पडतानाच सांगितले होते कि, “कोणत्याही संकटाला नाही म्हणायचं नाही.” त्यामुळे मी लगेच होकार दिला. हळूहळू सगळ्या गोष्टी मी समजून घेऊ लागलो. आणि त्यामध्ये एक असं दिसून आलं कि गेल्या वर्षीच्या EEA ला काहीतरी technical प्रॉब्लेम झाला होता. प्रत्येकाकडून हे ऐकून मी आणखीनच बावरलो, थोडा घाबरलो देखील. पण मनात म्हंटल कि ठीक आहे इतकं काय हि लढाई पण लढू आपण. हारनं किंवा जिंकन या पुढच्या गोष्टी आहेत. आधी प्रयत्न तरी करूया. म्हणून हि Technical ची जबाबदारी खांद्यावर घेऊन मी निघालो.

हळूहळू इव्हेंट जवळ येऊ लागला. प्रत्येकाचा काम करण्याचा वेग वाढत होता. मिटिंग, चर्चा, कामं यामध्ये दिवस कसा निघून जायचा हेच कळत नव्हतं. प्रत्येकाच्या ओठावर फक्त एकच EEA येतोय. अश्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची मला आधीपासूनच आवड, त्यात हि मिळालेली संधी. आता फक्त सोनं करण्याचं बाकी आहे.

इव्हेंट चा दिवस उजाडला. तसा मला थोडा उशीर झाला ऑफिस ला पोहचायला. गेल्या गेल्या बॅग ठेऊन डायरेक्ट कामाला लागलो. व्हिडिओ, ऑडिओ, आणि Slide हे सगळं माझ्याकडे होतं. म्हणजेच मी काय दाखवेल ते 350 लोकं बघणार. हे कळल्यावर मी अजून थोडा घाबरलो. त्यात अभि च्या चेहऱ्यावर देखील चिंतेच्या छटा दिसत होता. तो म्हणायचा मला, “अरे सागर! करशील ना रे व्यवस्तीत” मी त्यांना हसत फक्त एकच उत्तर द्यायचो “दादा तू Technical च नको टेन्शन घेऊ त्याची सगळी जबाबदारी माझी.” इव्हेंट च्या दिवशी अचानक एक मिटिंग ठेवण्यात आली होती. त्या मिटिंग साठी बाहेरच्या कंपनीचे सगळे CEO येणार होते. आणि या मिटिंग च थोडंफार काही Technical होतं ते देखील मलाच पाहावं लागणार होतं. मिटिंग च्या आधी मी सगळं रेडी केलं आणि थांबलो. पण प्रोजेक्टर च मला काही माहिती नव्हतं म्हणून मग गणेश आणि अविनाश ने मला मदत केली. त्यानंतर फक्त एकदा सांगून गेले. मला तरी काहीच कळेना नेमकं काय करायचं ते. एका सरांचा लॅपटॉप मी जोडला आणि प्रोजेक्टर चालू झाला. आणि मनात एक वेगळीच शांती निर्माण झाली. मिटिंग व्यवस्तीत पार पडली.

आता चालू होणार होता. महत्वाचा इव्हेंट, सगळ्यांची लगबग चालू झाली. ठरल्याप्रमाणे मी पहिला व्हीडिओ प्ले केला. तो चालू झाला आणि न काही अडथळा येता तो चालला. ३:३० ते ४:०० पर्यंत तो व्हीडिओ चालू ठेवला. बरोबर चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि चालू झाली खरी परीक्षा, श्रद्धा Anchoring करत होती आणि कार्यक्रमाला पुढे घेऊन जात होती. तशी थोडी मनात भीती वाटत होती. त्यामुळे मी १ मिनिट शांत बसलो आणि आणि काय होतंय ते होउदे म्हणून प्रयत्न चालू केले. एका मागोमाग एक असं करत मी सात व्हीडिओ प्ले केले आणि आनंदाचं म्हणजे एकही प्रॉब्लेम न येता अर्ध कार्य पूर्ण झालं होतं. त्यानंतर चर्चासत्र झाल्यानंतर दोन व्हीडिओ होते. आणि ते सुद्धा काहीच प्रॉब्लम न येता सगळं काही सुरळीत पार पडलं. आणि पूर्ण देआसरा टीम च्या चेहऱ्यावर विजयी मुद्रा उमटली. सगळे खुश होऊन पुन्हा कामाला लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव हेच सांगत होता कि. आपण केलेल्या कामाचं चीझ झालं. एखादी टीम जर खंभिर असेल तर अर्धा विजय त्यांनी तिथेच मिळवलेला असतो. हे माझ्या सरांनी इ. १० वि मध्ये असताना सांगितलेलं वाक्य आठवलं. व्यवस्तीत झाल्यानंतर दोन्ही अभिषेक नी आनंदाने मारलेली मिठी, त्या मिठीने ने तर एक वेगळाच आनंद दिला.

नंतर प्रत्येकाने सगळ्यांना शुभेच्छा देऊन, प्रत्येकाची स्तुती करून, एकमेकांना धन्यवाद देत, सँडविच खाऊन घरच्या रस्त्याकडे आपला मार्ग वळवला.

देआसरा ने मला हि संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केल्याने हे सगळं मस्तपैकी जमलं आणि EEA आपला पार पडला. त्याबद्दल खूप शुभेच्छा….आणि पुन्हा एकदा धन्यवाद…!

शेवटी इतकंच
एखादं संकट येतं, तर ते आपल्याला पाडण्यासाठी नाही तर आपल्यातील क्षमता ओळखण्यासाठी असतं. म्हणून संकटांना कधी नाही म्हणायचं नसतं बरं का.

“क्योकी जिनके इरादे नेक और मजबूत होते है, उनकी कश्तिया कोई नही डुबा सकता…”

आपलाच
सागर बरडे…

 

Article Contributor:

Sagar Barde

IT Executive, deAsra

sagar barde